डीएमआयसी प्लॉट नोंदणी
नवभारत अभियानच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून आपण डीएमआयसी मध्ये शासनाने अधिग्रहित केलेल्या दहा हजार एकर जमीन क्षेत्रापैकी बेरोजगार तरुणांना प्रत्येकी 1000 स्क्वेअर मीटर चे प्लॉट्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणे सवलती दरात मिळावेत म्हणून मंत्रिमंडळ बैठक औरंगाबाद येथे आमरण उपोषण करून संबंधित मागणी शासनाकडे लावून धरली त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन नागपूर यावेळेस आमरण उपोषण करून सदर मागणी शासनाकडे करण्यात आली तसेच मुंबई मंत्रालयासमोर आझाद मैदान या ठिकाणी नवभारत अभियानच्या शहर जिल्हा शाखेच्या वतीने आमरण उपोषण करून डीएमआयसी शेंद्रा व बिडकीन या ठिकाणी एम एस एम ए प्लॉट मायक्रो स्मॉल मिडीयम अशा स्वरूपाचे प्लॉट मागास बेरोजगार तरुणांना सवलतीदारात म्हणजेच 1000 स्क्वेअर मीटर प्लॉट शेतकऱ्यांना सहा लाख रुपये प्रत्येकी वाटप करण्यात आले त्याच धर्तीवर सदर प्लॉट वितरित करण्यात यावेत व सामाजिक न्याय विभागाची 30% अनुदानित रक्कम सदर औद्योगिक भूखंडधारकांना देण्यात यावी करिता मागील एक ते दीड वर्षांपासून लोकशाही मार्गाने नवभारत अभियान विविध संबंधित कार्यालयांना पत्र व्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत असून नमूद ठिकाणी 5000 प्लॉट बेरोजगार तरुणांना मिळावेत म्हणून अविरतपणे लढा देत आहे सदर लढा संबंधित अधिकाऱ्यांच्या संबंधित मंत्री महोदयांचे व संबंधित विभागाचे सचिव डीएमआयसी चे संचालक सहसंचालक सिटीचे जनरल मॅनेजर त्याचबरोबर एमआयडीसी औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन शेंद्रा व बिडकीन डीएमआयसी मध्ये एम एस एम इ उद्योगांसाठी संबंधित अधिकारी संचालक यांनी लेआउट टाकण्यास मंजुरी दिली असून आपणास जे जे प्लॉट मागणी धारक आहेत त्यांची टी सी व आधार कार्ड पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर सह सादर करणे असून इच्छुकांनी लवकरात लवकर सादर करावे.